संकेश्वर (प्रतिनिधी) : राजकारणात आपण काॅंग्रेस पक्षात असून मंत्री उमेश कत्ती यांचा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे ए. बी. -कत्ती यांना एकाच नाण्याचे दोन बाजू म्हणणे चुकीचे ठरणार आहे. राजकारणात मी कत्तींचा कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, काॅंग्रेसचे कार्यकर्ते आणि लोकांत निष्कारण गैरसमज निर्माण होता कामा नये यासाठी या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करीत आहे. आगामी निवडणुकीत आपण आखाड्यात उतरणार आणि विजयी होणार यात तीळमात्र शंका नाही. निवडणुकीची तयारी कशी करावयाची ते मला चांगले ठाऊक आहे. कत्ती बंधू सहकारात जे राजकारण करीत आहेत. ते लोकांना चांगले माहित आहे. त्यामुळे त्याविषयी जास्त सांगणे नको. हुक्केरी मतक्षेत्रात लोकांत कत्ती विषयी असणारी नाराजी गेल्या निवडणुकीत लोकांनी मतदानातून दाखवून दिले आहे. हुक्केरी मतक्षेत्रात काॅंग्रेसला निश्चितच “अच्छे दिन ” आले आहेत. काॅंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते काॅंग्रेस पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसलाच मतदारांचा आशीर्वाद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.