संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर माजी नगराध्यक्ष गजानन क्वळी यांची निवड करण्यात आली आहे. संकेश्वर निंगापण्णा क्वळी सौहार्द सहकारी संस्थेतर्फे जिल्हा बॅंकेचे नूतन संचालक गजानन क्वळी यांचे विशेष अभिनंदन करुन भरमा पुजारी, सलीम मुल्ला (सीईओ) यांनी सन्मानित केले. यावेळी बोलताना गजानन क्वळी म्हणाले तुंम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मला पुन्हा जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली आहे. संचालकपदाचा लाभ जिल्हा बॅंकेशी निगडित सहकारी संस्थांना बॅंकेच्या सभासदांना मिळवून देण्याचे कार्य आपण निश्चितपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निंगपण्णा क्वळी सौहार्दचे संचालक भरमा पुजारी, कर्मचारी आनंद कोठरी, बिरसिध्द मुसाई, अजित पुजारी, अविनाश संसुध्दी, अमित खवणेवाडी उपस्थित होते.
Check Also
संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी
Spread the love संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. …