संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर- अंकले रस्ता प्राथमिक शाळेला श्रीमती गोदाबाई कर्निंग मेमोरियल फौंडेशनतर्फे दोन तिजोरी, २० डेस्क, ३ ग्रिनबोर्ड, १ वाॅटर फिल्टर
असे १ लाख २० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सरकारी प्राथमिक शाळा वाचविण्यासाठी आता देणगीदारांनी पुढे येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. येथील अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेला आवश्यक असणारे १ लाख २० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य दिलेबदल शाळेतर्फे श्रीमती गोदाबाई कर्निंग मेमोरियल फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती कविता कर्निंग, नवीन गंगरेड्डी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी ॲड. विक्रम कर्निंग, महेश नेसरी, सीआरपी एम. एस. पुजारी, नगरसेवक सचिन भोपळे, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष इरफान कागले, उपाध्यक्षा राजेश्री गस्ती, मुख्याध्यापिका श्रीमती पी. सी. बडिगेर, शिक्षिका एस. एन. हट्टीकर, आर. एस. भंडारी, के. एस.
राजापूरे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती पी. सी. बडिगेर यांनी केले. आभार शिक्षिका के. एस. राजापूरे यांनी मानले.