संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठात महाशिवरात्रीला देवदर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत भक्तांनी देवदर्शनाबरोबर श्रींचा आशीर्वाद घेतला. मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात शंकरलिंग पिंडीवर अभिषेक पूजाअर्चा करण्यात आली. पुरोहित श्रीपाद उपाध्ये आणि अन्य पुरोहितांनी अभिषेक कार्यक्रमात आपला सहभाग दर्शविला. मठात भक्तांना केळी राजगिरा लाडू प्रसाद स्वरुपात वाटप करण्यात आले. मठ भक्तांनी फुलून गेलेला दिसला.
श्री शंकरलिंग मंदिरात अभिषेक
श्री शंकरलिंग समुदाय भवन येथील श्री शंकरलिग मंदिरात महाशिवरात्री निमित्त अभिषेक पूजाअर्चा पुरोहित नरेंद्र उपाध्ये यांनी केली. येथील महाशिवरात्री कार्यक्रमात उद्योजक बाळकृष्ण हतनुरी, शंकरराव हेगडे, एल. पी. शेंडगे, शिवाजीराव कळवीकट्टीकर, महेश देसाई, रामू कापसे,।महादेव केसरकर, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, चिदानंद कर्देण्णावर, गंगाराम भूसगोळ, गिरीश कुलकर्णी, जयप्रकाश सावंत, नंदू मुडशी, संतोष कमनुरी, राहुल हंजी, नागेश क्वळी, सुरेश हुंच्याळी, पुष्पराज माने, नितिन पलसे, राजेश गायकवाड बंडू सुर्यवंशीसह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येथे भक्तगणांना केळी पेढे आणि ऊसाचा रस प्रसाद स्वरुपात वाटप करण्यात आले.