बेळगाव : महाशिवरात्रीनिमित्त शिव महापूजेचे आयोजन करण्यात आले. शाहूनगर व नेहरूनगर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे येथील शिव मंदिरामध्ये महापूजा करून दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री. तुकाराम पाटील तसेच शाहूनगर येथील अध्यक्ष श्री. श्रीकांत कदम व इतर ट्रस्टचे सदस्य व युवक मंडळ व महिला मंडळ यांनी परिश्रम घेऊन मोठ्या प्रमाणात सोहळा संपन्न करण्यात आला. या सोहळ्यामध्ये खासदार मंगला अंगडी, तसेच आमदार श्री. अनिल बेनके, नगरसेविका सौ. रेश्मा प्रवीण पाटील, नगरसेवक सुरेश नाकाडी उपस्थित होते.