संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती हे यल्लीमन्नीळी येथील मुस्लिम समाजाच्या एका विवाह समारंभात सहभागी झाले होते.विवाह समारंभात दुल्हन बिदाई प्रसंगी बाबुलकी दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले या गीताची धून सुरु करताच रमेश कत्ती त्या गाण्यात तल्लीन होऊन गेले. त्यांनी विवाहाच्या मंडपात गाण्याच्या प्रत्येक पंगतीवर हावभाव (ॲक्शन) करीत गाण्याला साथसंगत करतांनाचे दृश्य पाहून लोक अचंबित झाले. रमेश कत्ती यांच्या संगीतप्रेमाला लोकांनी वाह-वाह करीत दाद दिली. रमेश कत्ती यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारे असेच आहे.
निलकमलचे गाणे आजही हिट
हिंदी चित्रपटसृष्टीत १९६८ मध्ये गाजलेल्या निलकमल चित्रपटातील बाबुल की दुआए लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले. हे गाणे तब्बल ५४ वर्षानंतरही लोकप्रिय ठरले आहे. सर्वसमाजातील विवाह समारंभात निलकमलचे बाबुल की दुआए लेती जा, हे गाणे हमखास ऐकावयास मिळते. मुलीच्या बिदाई प्रसंगी माहेरच्या मंडळींना आणि नववधुला रडविणाऱ्या या गीताला साहीर लुधयानवी यांचे संगित असून गीतकार रवि यांचे गाणे मोहम्मद रफी यांनी गायिले आहे. सदर गाण्याला रमेश कत्ती यांनी दिलेली दाद लोकांत चर्चेत दिसत आहे. विवाह सोहळ्यातील कत्ती यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो लोकांच्या चांगलाच पसंतीला उतरलेला दिसतो आहे.