Saturday , July 27 2024
Breaking News

संकेश्वरात २ तास पाण्याला २४ तास ऐसे नाव…

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिका सभागृहात आयोजित सभेत पाणीपट्टी जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी भूषविले होते. ७ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या मासिक सभेत सर्व २८ सदस्यांनी संकेश्वरकरांची नळपाणी पट्टी वर्षाकाठी २ हजार रुपये ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेऊन तसा ठरावही संमत केला होता. मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी सदस्यांच्या ठरावाला कचरापेटी दाखवित मिटर रिडिंगनुसारच पाणीपट्टी कायम ठेवली आहे. आज सभेत उटी साहेबांनी गावात एकूण ६५५० नळधारक असून पैकी ४४०० नळधारकांची पाणीपट्टी महिन्याकाठी ८० ते ९० रुपये येत असल्याचा सर्व्हे अहवाल सादर केला. त्यामुळे पाणीपट्टी वाढ झाल्याचा आवाज उठविणाऱ्या सदस्यांची बोलती बंद झाली. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे म्हणाले, आपणाला वीस एक लोकांनी काॅल करुन पाणीपट्टी महिन्यांसाठी ९० रुपये मात्र येत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पाणीपट्टी वर्षाकाठी २ हजार रुपये करणे चुकीचे ठरणार आहे. याकरिता पाणीपट्टी जैसे थे ठेवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सांगितले. मिनिमम पाणीपट्टी ८० रुपयांवरुन ४० रुपये करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ईटी यांनी मिनिमम पाणीपट्टी आणखी कमी करता येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. विरोधी सदस्यांनी पाणीपट्टी वर्षाकाठी दोन हजार रुपयांवरुन १५६० रुपये करण्याविषयी आपले मत मांडले. पण त्यावर सतारुढ-विरोधी गट नगरसेवकांत एकमत झाले नाही.

दोनच तास पाणीपुरवठा

अभियंता आर. बी. गडाद म्हणाले, २४×७ पाणीपुरवठा नाममात्र आहे. वास्तविक दोनच तास पाणीपुरवठा केला जातो.संपूर्ण राज्यात २४ तास पाणीपुरवठ्याची हीच स्थिती असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्याअर्थी सरकार २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करीत असल्याचे दिसून येते.

पालिकेत चोरीचा मामला

पालिकेतील महत्वाची कागदोपत्रे असलेली वही (बूक) चोरीला गेली तरी त्याविषयी मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद बेखबर असल्याचे नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांनी सभेच्या निर्दशनाला आणून दिले. त्यावर अधिकारी कोणती बूक गेलीयं हेच समजेनासे झाल्यचे सांगताच नगरसेवक अमर नलवडे यांनी अधिकारींना सदर विषय गांभीर्याने घेण्याविषयी सांगितले. सभेत सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, प्रमोद होसमनी सचिन भोपळे, विवेक क्वळी, जितेंद्र मरडी, डॉ. जयप्रकाश करजगी, विनोद नाईक, चिदानंद कर्देण्णावर, रोहण नेसरी, यांनी विविध विषयांवर आवाज उठविला.
संकेश्वर पालिकेला कोणी स्वच्छतेचा पुरस्कार दिला? असा प्रश्न नगरसेवक संजय शिरकोळी यांनी उपस्थित केला. गाव सगळे अस्वच्छ असताना संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सभापती सुनिल पर्वतराव म्हणाले, लोक स्वच्छतेच्या नावाने शिमगा करीत आहेत. सर्व सदस्यांनी गावातील स्वच्छतेचा विषय गांभीर्याने घेत सफाई कामगाराना एकत्र घेऊन प्रत्येक प्रभागात स्वच्छतेच निटनेटके कार्य करायला हवे असल्याचे सांगितले. सभेला नगरसेविका मनोरमा सुगते, श्रीविद्या बांबरे, सुचिता परीट, रिजवाना रामपूरे, शेवंता कब्बूरी, पार्वती नाईक, लता मरडी, महादेवी संसुध्दी, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *