Monday , June 16 2025
Breaking News

यंदा कर वाढ नको; आमदार अनिल बेनके

Spread the love


बेळगाव : बेळगाव महापालिकेकडून यावर्षी जवळपास साडेतीन टक्के कर वाढ असल्याची माहिती मिळताच उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी तात्काळ महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना कर वाढ करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन सादर केले.
तत्पूर्वी आमदार बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि नगरविकास मंत्री बसवराज भैरत्ती यांची देखील यांच्याकडे देखील लेखी स्वरूपात मागणी केली होती आता त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन बेळगाव महापालिकेने यंदा कर वाढ करू नये, अशी मागणी केली आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनाचा कहर अतिवृष्टी आणि पुरामुळे लोक अगोदरच त्रस्त आहेत त्यात उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने लोकांना भरपूर नुकसान झाले आहे आर्थिक मंदी असल्याची स्थिती आहे मागील वर्षी जो कर होता तोच कर यावर्षीही देखील लागू करावा असं अनिल बेनके यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कर वाढी संदर्भात लवकरच मी मुख्यमंत्री नगरविकास मंत्र्यांची भेट घेणार आहे त्यामुळे तुम्ही बेळगाव महापालिकेतून कोणताही आदेश पारित करू नका, असेही बेनके यांनी महापालिका आयुक्त घाळी यांना सांगितले आहे.
सामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असून यावर्षीची कर वाढ रद्द करावी असेही त्यांनी म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने पाद्य पुजन व पाठ पुजन मोठ्या भक्तीभावात संपन्न

Spread the love  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *