संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ भक्तगणांकडून श्री स्वामी समर्थ प्रकटदिन भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री दुरदुंडीश्वर सभागृहात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ प्रतिमेचे पूजन, अभिषेक आरती करुन भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बोलताना संतोष मगदूम म्हणाले, गेली दोन वर्षे झाली कोरोना महामारीमुळे श्री स्वामी प्रकटदिन सोहळा आम्हाला साजरा करता आला नाही. यंदा श्रींच्या कृपेने कोरोनाचे संकट टळले आहे. गेली सोळा वर्षे झाली अनिल जवंजळ, बाळू पलसे आणि आपण श्री स्वामी समर्थ प्रकटदिन कार्यक्रमाचे आयोजन करताहोत. यंदा श्री मठाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रींची पूजाअर्चा अभिषेक आरती, कार्यक्रमात भक्तगणांनी सहभागी होऊन पुनित होण्याचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ प्रकटदिन कार्यक्रमात बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी, उद्योजक अभिजित कुरणकर, बसवराज बागलकोटी, दामोदर खटावकर, नितिन पलसे, सुहास भिसे, जयप्रकाश सावंत, भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
