बेळगाव : खासदार इराण्णा कडाडी यांनी आज सोमवारी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खास. कडाडी यांनी बेळगावमधील नियोजित आयटी पार्कच्या जागेबाबत राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा केली. बेळगावच्या आयटी पार्क संदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याची विनंती यावेळी खास. कडाडी यांनी केली. यावेळी केंद्रीय वाणिज्य, कोळसा आणि खाण राज्यमंत्री प्रल्हाद जोशी, चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि राज्यसभा सदस्य श्री. के. आनंद उपस्थित होते.
