Saturday , July 27 2024
Breaking News

उत्तम डॉक्टर व्हा : डॉ. जयप्रकाश करजगी

Spread the love

संकेश्वर (वार्ता) : श्री बिरेश्वर शिक्षण संस्था संचलित कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी उत्तम डॉक्टर व्हावा, असे शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले.
ते कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ’तरंग’-2021-22 समारंभात अध्यक्षस्थानी बोलत होते.
प्रारंभी विद्यार्थिनींने स्वागतगीत सादर केले. प्रमुख पाहुणे राजीव गांधी विद्यापिठाचे डीन. श्रीनिवास बन्नीगोळ, जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, डॉ. एस. एस. खज्जण्णावर, डॉ. एम. एस. गवीमठ यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची शानदार सुरुवात करण्यात आली.
डॉ. करजगी पुढे म्हणाले, आमचा कृष्णा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी रुग्णसेवा हिचं खरी ईश्वरसेवा समजून वैद्यकीय क्षेत्रात उत्तम सेवेने कृष्णा मेडिकल कॉलेजचे नावलौकिक करणारा ठरावा, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे बेळगांव जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ म्हणाले, संकेश्वर मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांवर चांगले उपचार करण्याबरोबर कोरोना काळात मृतांवर अंत्यसंस्काराचे कार्य करुन मानुष्कीचे दर्शन घडवून आणले आहे. संकेश्वर डॉक्टरांनी केलेले कार्य जिल्ह्यात कौतुकास्पद ठरल्याचे त्यांनी सांगितले.
समारंभात बीएमएस अंतिम वर्षातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. विद्यापिठात रँक पटकाविणारी वैष्णवी कणगली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
समारंभाला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. एस. एस. खजण्णावर, प्राचार्य डॉ. एम. एस. गवीमठ, बिना गवीमठ, प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *