संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिका आवारातील बागेला (गार्डनला) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरण करण्यात आले पण पुतळा उभारण्याचे कार्य गेल्या कांही वर्षांपासून राहून गेले होते. शुक्रवार दि. 14 रोजी पुतळा उभारणेच्या कार्याचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचे हस्ते करण्यात आल्याचे नगरसेवक अॅड. प्रमोद होसमनी यांनी सांगितले.
नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, पालिका सदस्यांनी श्रीफळ वाढवून डॉ. आंबेडकर पुतळा उभारणी कार्याला चालना दिली. अॅड. प्रमोद होसमनी पुढे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही पालिका गार्डनमध्ये डॉ. आंबेडकर पुतळा उभारण्याची मागणी करताहोत. त्याची दखल उशीरा का होईना घेतली गेली आहे. त्यामुळे पालिका गार्डनमध्ये डॉ. आंबेडकर पुतळा उभारण्याचे आमचे स्वप्न साकार होत असल्याने त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, सचिन भोपळे गंगाराम भूसगोळ, विवेक क्वळी, विनोद नाईक, रोहित नेसरी, माजी नगरसेवक संतोष हतनुरी, दिलीप होसमनी, संतोष सत्यनाईक, कुमार कब्बूरी, पिंटू सुर्यवंशी, मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद भिमसैनिक अनेक मान्यवर उपस्थित होते.