Monday , March 17 2025
Breaking News

गौरव्वा मर्डर प्रकरणाचा तपास लागला?

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार मर्डरचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.
संकेश्वर पोलीसांनी मर्डर प्रकरणाचा तपास जारी असल्याचे सांगितले आहे. गौरव्वा मर्डर केस यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश छायागोळ हे गौरव्वा मर्डर प्रकरणातील आरोपींचा तपास लावण्याचे काम विविध पुराव्यांच्या आधारावर करताहेत. मर्डर प्रकरणात आठ जणांना चौकशीसाठी अटक केल्याची चर्चा असून यामध्ये संकेश्वरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. गावभर सदर संशयित व्यक्तीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
वीस लाखांचे पन्नास लाख
गौरव्वा सुभेदार ह्या व्याजाचा व्यवहार करीत होत्या. पैशाच्या देण्या-घेणेच्या व्यवहारातून गौरव्वाला जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. गौरव्वाने एकदा पाच लाख याप्रमाणे वीस लाख रुपये एकाला कर्जाने दिले होते. कर्जाची रक्कम व्याजासकट पन्नास लाख झाली होती. त्याची वसुली दमदाटीने करताना मर्डरची घटना घडल्याचे देखील सांगितले जात आहे.
रडण्याचा आवाज नाही
गौरव्वा मर्डरची बातमी समजताच नातेवाईक जमा झाले. पण गौरव्वा सरणार्‍या वाटेवरून जाताना रडण्याचा आवाज कांहीं ऐकू आला नाही. त्यामुळे लोकांत गौरव्वा जाण्याचं नातेवाईकांना दु:ख नाही काय? असा प्रश्न उपस्थित होतांना दिसला. गौरव्वाची स्थावर मालमत्ता, पैसा आडका सोनं कोणाला? या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी निरुत्तर राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरा शुगर अध्यक्षपदी बसवराज कल्लटी तर उपाध्यक्षपदी अशोक पट्टणशेट्टी यांची निवड

Spread the love  संकेश्वर : बहुचर्चित ठरलेल्या हिरा शुगरच्या नूतन अध्यक्षपदी बसवराज कल्लटी तर उपाध्यक्षपदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *