संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बसस्टँड येथे स्टाईलने दुचाकी चालवितांना दुचाकीवरील ताबा सुटून तिघेजण दुचाकीसह बसच्या चाकाखाली सापडले. बसचालकाने लागलीच ब्रेक लावल्याने बसखाली सापडलेल्या तिचा युवकांचे प्राण वाचले आहेत. सदर अपघात आज सायंकाळी 4:50 च्या दरम्यान घडला. अपघातात दुचाकी चिरडली गेली आहे. दुचाकी चालक आणि त्यावरील दोघे स्वार सुदैवाने कांही इजा न होता बचावले आहेत. बस चालकांने सावधगिरी बाळगत ब्रेक लावून तीन फुटांपर्यंत बस फरफट नेल्यामुळे तिघेजण सहीसलामत बचावले आहेत.
Check Also
घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू
Spread the love हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …