संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्रिया कुमार बस्तवाडी हिने दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९७.१२% गुण संपादन करुन गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदविले आहे. कुमारी प्रिया बस्तवाडी हिचे विशेष अभिनंदन स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश देसाई, सचिव श्रीमती एम. के.पाटील, शाळेचे मुख्याध्यापक नविन चौगला यांनी केले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कुमारी प्रिया म्हणाली आई-वडीलांचे प्रोत्साहन, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मन लावून अभ्यास केला. त्यामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन करता आले. दहावी परिक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी घेतलेले परिश्रम सत्कारणी लागेल. सायन्स (विज्ञान) शाखा निवडली आहे. अकरावी-बारावीत चांगले गुण मिळवून डाॅक्टर होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. दहावी परिक्षेत ९७.१२ % गुण मिळविण्यासाठी आई- वडिलांचे प्रोत्साहन महत्वाचे ठरल्याचे तिने सांगितले.
Check Also
घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू
Spread the love हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …