संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री तुळजाभवानी गोंधळी समाजातर्फे संकेश्वर हाॅटेल संघटनेचे नूतन अध्यक्ष रामचंद्र भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रामचंद्र भोसले म्हणाले, तुळजाभवानी गोंधळी समाजाचा सत्कार आपणाला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. संकेश्वरातील हाॅटेल व्यवसायाला चांगली दिशा देण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करुन दाखविणार आहोत. यावेळी तुळजाभवानी गोंधळी समाजाचे कृष्णा दवडते, परशराम शिसोदे, रवि दवडते, शशीकांत दवडते, महेश दवडते समाज बांधव उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि आभार महेश दवडते यांनी रामचंद्र भोसले यांची हाॅटेल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोंधळी समाज बांधवांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
