संकेश्वर (महंमद मोमीन) : जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिवाजी चौक येथील शिवस्मारक चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी शिवस्मारक शिलान्यासचे पूजन केले. पुरोहित मदन पुराणिक यांनी मंत्रपठणात शिवस्मारक चौथऱ्याचे विधीवत पूजन केले. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, जयप्रकाश सावंत, सौ. सविता सावंत दांपत्याच्या हस्ते पूजाविधी कार्यक्रम पार पडला. संकेश्वर शिवाजी चौक येथे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा चौथरा उभारला जाणार आहे. या कार्याचा शुभारंभ आज शिवस्मारक समितीचे पदाधिकारी, सदस्य शिवभक्त शिवप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिवस्मारक चौथरा पायाभरणीसाठी श्रीराम शिला २१ गड किल्ल्यांची माती आणण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे (सिंहगड), हेरखाते प्रमुख बहर्जी नाईक समाधी स्थळ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ आणि समाधी स्थळ, (वाटू बुद्रुक, पुरंदर) स्वराजाचा गड तोरणा, विशाळगड येथील पुण्य मातीचा समावेश होतो. पायाभरणी सोहळ्यात माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, डॉ. नंदकुमार हावळ, रमेश कुरणकर, महादेव डावरे, अप्पा मोरे, सुधाकर ओतारी, राजेंद्र बोरगांवी, डॉ. मंदार हावळ, दिपक भिसे, पिंटू परीट, जयप्रकाश खाडे, पुष्पराज माने, राजेश गायकवाड, सुभाष कासारकर, शाम यादव, अप्पा शिंत्रे, महेश दवडते, अमोल अटक, राजू बांबरे, शिवा आरभांवी, गजू मोकाशी, सचिन मोकाशी, संदिप बांबरे शिवभक्त शिवप्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू
Spread the love हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …