Wednesday , December 4 2024
Breaking News

पुष्पहार तुझ्या गळा-माझ्या गळा…

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे नूतन नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे. व्यापारी नंदू मुडशी हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. एकीकडे नंदू मुडशी यांचा सत्कार होत असताना दुसरीकडे नंदू आपल्या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे विशेष अभिनंदन करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. नंदू मुडशी हे सर्व मतदार बंधू-भगिनीचे आभार मानताना पेढे वाटप करुन त्यांचे तोंड गोड करताहेत. ते प्रभाग १३ मधील ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या पदस्पर्शाने आर्शीवाद घेताहेत. संकेश्वर सौहार्द सहकारी संस्थेतर्फे नूतन नगरसेवक नंदू मुडशी यांचा सत्कार संकेश्वर सौहार्दचे चेअरमन अमर नलवडे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक जयप्रकाश खाडे पिंटू परीट, बसगौडा पाटील, कर्मचारी संदिप कदम, अप्पा शिंत्रे, उपस्थित होते. हलगापूरगडचे माजी अध्यक्ष पवन पाटील, नगरसेवक ॲड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, नूपूर तंबद, शंकर बस्तवाडी, महेश हळीजोळी, काडेश बस्तवाडी, रामू काकोळी, अर्जून बस्तवाडी यांनी नंदू मुडशी यांना अभिनंदनपर शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू

Spread the love  हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *