बेळगाव : राज्यात होऊ घातलेल्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मत देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये भाजप मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. वायव्य पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार हनुमंत निराणी आणि शिक्षक मतदारसंघाचे अरुण शहापूर यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. यानंतर सदाशिव नगर मैदानात भव्य समावेश मेळावा आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना हनुमंत निराणी यांनी आपल्याला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी ७० वर्षानंतर आपल्या सरकारने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. सातवा वेतन आयोग देखील सरकारने कार्यान्वित केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुविधा, कोविड काळात देखील सर्व सुविधा, वेतन सरकारने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
भव्य समावेश मेळावा आणि मतयाचना कार्यक्रमात वायव्य पदवीधर शिक्षक मतदार संघातील दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. गेल्या आठवड्यापासून सर्व तालुक्यात भेटी देऊन शिक्षक आणि पदवीधरांच्या भेटी घेऊन समस्याच जाणून घेण्यात येत आहेत. काँग्रेसकडून हि निवडणूक आपणच जिंकू असे सांगण्यात येत आहे. परंतु या मतदार संघासाठी प्रकाश हुक्केरी यांची निवड करण्यात आली असून प्रकाश हुक्केरी हे खासदार, विधानसभा, विधान परिषदेत देखील निवडणूक लढलेले उमेदवार आहेत. प्रकाश हुक्केरी यांना शिक्षकांसंदर्भात काहीच माहिती नाही. परंतु भाजप उमेदवार अरुण शहापूर यांना शिक्षकांच्या सर्व समस्या माहित आहेत, त्यांना काळजी आहे. त्यामुळे अरुण शहापूर हे विजयी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी पालक मंत्री गोविंद कारजोळ बोलताना म्हणाले, शिक्षकांच्या समस्या आणि त्यांच्याबद्दल काळजी असणारे उमेदवार या निवडणुकीत उभे राहणे गरजेचे आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना काळजी आहे. यामुळे आताच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारालाच विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास बेळगाव, बागलकोट आणि विजापूरमधील आजी माजी आमदार, खासदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …