Sunday , July 21 2024
Breaking News

राजा लखमगौडांचं नावलौकिक करणार : मंत्री उमेश कत्ती

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : हिडकल डॅम येथील ५०० एकर जमीनीचा विकास करुन उद्यान काशीने राजा लखमगौडांचं नावलौकिक करणे हेच आपले लक्ष आणि ध्येय असल्याचे हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार व राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले.

ते हिडकल डॅम येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक योग दिनानिमित्त आयोजित ‘हसीर हब्ब’ समारंभात अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी शालेय मुला-मुलीनी नाडगीत सादर केले. श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन समारंभाची सुरुवात करण्यात आली. मंत्रीमहोदयांनी राजा लखमगौडा जलाशय येथे ११ हजार वृक्षारोपण आणि एक लाख विविध वृक्ष रोपांच्या बिजारोपण कार्यक्रमाला चालना दिली. वृक्षारोपण कार्यक्रमात शालेय शिक्षक-शिक्षिका, मुले-मुली, ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य, पीकेपीएस पदाधिकारी, अंगणवाडी सेविका यांनी आपला सहभाग दर्शविला. समारंभाचे आयोजन जिल्हा व तालुका प्रशानाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. समारंभाला निडसोसी, गदग, संकेश्वर, हुक्केरी, यमकनमर्डी, क्यारगुड्ड, तसेच अन्य मठाचे महास्वामीजी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत राजेंद्र पाटील यांनी केले.
मंत्री उमेश कत्ती पुढे म्हणाले, हिडकल डॅम येथील राजा लखमगौडा जलाशय आता उद्यान काशी नावाने ओळखले जाणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून आपण पाहिलेले राजा लखमगौडा उद्यान काशीचे स्वप्न आज साकारत आहे. म्हैसूर सारखे येथे वृध्दांवन गार्डन साकारले जाणार असून राजा लखमगौडा उद्यान काशी हे उत्तर कर्नाटकातील महत्वाचे पर्यटन स्थळ करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती म्हणाले, हुक्केरी मतक्षेत्राचा सर्वांगिण विकास साधण्याचे कार्य मंत्री उमेश कत्तीं यांनी करुन दाखविले आहे. त्यांनी मतक्षेत्रातील शेतीचा पाणी प्रश्न, लोकांचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडवून दाखविला आहे. हिडकल डॅम येथील उद्यान काशी करिता मंत्रीमहोदयांनी सहाशे एकर जमीनीचा विकास साधण्याचे कार्य हाती घेतले आहे. येथील उद्यान काशीसाठी अदमासे ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आज आम्ही जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत आहोत. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही चिंतेची गोष्ट बनली आहे. शेतजमीन विविध रासायनिक खतांचा वापर करून बाद करण्यात आपणा सर्वांचा हातखंड राहिला आहे. त्यामुळे सुपिक शेतीचे प्रमाण घटतांना दिसत आहे. शेतकरी बांधवांनी शेतजमीन वाचविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, हुक्केरी गदग मठाचे महास्वामीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंगेश जी भेंडे, अरविंदराव देशपांडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभाला माजी मंत्री शशीकांत नाईक, अशोक शिंत्रे, श्रीकांत कदम, परमेश्वर हेगडे संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, हिरण्यकेशी साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती, युवानेते पवन कत्ती पृथ्वी कत्तीं, हुक्केरी पट्टणपंचायतचे अध्यक्ष ए.के पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, राजेंद्र संसुध्दी, महेश देसाई, संकेश्वर पालिकेचे नगरसेवक अमर नलवडे, शिवानंद मुडशी, राजेंद्र बोरगांवी, संतोष कमनुरी, पवन पाटील,अनेक मान्यवर शालेय शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिंनी, ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य, पीकेपीएस पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय मुला-मुलीच्या राष्ट्रगीताने समारंभाची सांगता करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *