संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर इंदिरा नगर येथे चोरांनी बंद घरांना टार्गेट करुन रोख १ लाख २० हजार रुपये, तांब्याचा हांडा, तांब्याच्या घागरी, चांदीचे पैंजन, मिक्सर घेऊन पोबार केला आहे. चोरांनी बंद घरांचा अंदाज घेऊन चोरी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संकेश्वर पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
आता लगीन कसे करायचे?
इंदिरा नगर येथील तब्बूसम बशीर भाई हिने आपल्या मुलीच्या लग्न कार्यासाठी पै-पैने साठविलेले १ लाख २० हजार रुपये, एक तांब्याचा हांडा, दोन तांब्याच्या घागरी, दोन जोड चांदीचे पैंजन, पितळ भांडी घेऊन पोबार केला आहे. तब्बसूम या राधानगरी येथील मन्नत कार्यक्रमासाठी सहकुटुंब गेल्या असता चोरीची घटना घडली आहे. तब्बसूम घरात चोरी झाल्याचे समजताच घाय मोकळून चोरांना शिव्याशाप देत रडू लागल्याने झाला प्रकार लोकांच्या लक्षात आला. तब्बसूम यांच्या घरापासून कांही अंतरावर असलेल्या दोन बंद घरांवर चोरीची घटना घडली आहे. तेथून चोरांनी जीवनावश्यक वस्तू चोरुन नेल्या आहेत.
परिक्षा प्रवेश पत्रिकेची चोरी
चोरांनी तब्बसूम यांच्या घरातून चोरलेल्या बॅगेत मुलींच्या काॅलेज परिक्षेची प्रवेश पत्रिका आहे.
तीन दुभत्या म्हैसींची चोरी
अंबिका नगर येथील शेतकरी अरुण कळीवाले यांच्या तीन दुभत्या म्हैसी दिवसाढवळ्या गायब होण्याचा प्रकार घडला आहे. म्हैसी चरण्यासाठी घेऊन गेले असता चोरीचा प्रकार घडला आहे. अरुण कळीवाले म्हैसींचा शोध घेण्यासाठी सर्वत्र विचारपूस करताना दिसत आहेत.