बेळगाव : पहाटे पाच वाजता टिळकवाडी येथील दुसरा रेल्वे गेट जवळ एक अज्ञात वृद्ध व्यक्ती उघड्या अवस्थेमध्ये एका बंद वाहनावर बसवण्यात आली होती. त्याचे वय सुमारे 65 वर्षे होते. थंडीने कुडकुडत बसलेल्या त्या वृद्धाकडे सफाई कामगार महिलांची नजर गेली. या भागात दैनंदिन कचरा गोळा करणार्या तिघा महिला अनुक्रमे शारदा, भारती आणि माया या तिघांनी मिळून अज्ञात व्यक्तीची दशा बघून त्याला आपल्या जवळ असलेले अंगावरील स्वत:चे ब्लँकेट त्या व्यक्तीच्या अंगावर घालून त्याला थंडीपासून बचाव केला.
त्यावेळी तिथून जात असलेले समाजसेवक प्रसाद कुलकर्णी यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर आणि संतोष दरेकर यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब टिळकवाडी पोलीस स्टेशनला कल्पना दिली. पोलीस कर्मचार्यांना माहिती देऊन सुरेंद्र अनगोळकर यांच्या रुग्णवाहिकेतून त्या अज्ञात व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
संतोष दरेकर यांच्या मदतीने प्रसाद कुलकर्णी, राम तेंडोलकर, येथील चहा विक्रेते नारायण गावडे, यांनी या मदत कार्यासाठी अथक परिश्रम घेतले. यावरून माणुसकीचे दर्शन घडले आहे.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …