संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील एका पित्याने आपल्या कन्येचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने नेत्रदान करुन साजरा केला आहे. येथील रितीका मिल्क सेंटरचे मालक व संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनचे सदस्य प्रभाकर जी पाटील यांनी आपली कन्या कुमारी रितीका हिचा सहावा वाढदिवस बेळगांव केएलई नेत्रपेढीला नेत्रदान करुन कुटुंबासमवेत साजरा केला आहे. त्यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसाला नेत्र गिफ्ट केले आहे. प्रभाकर पाटील यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसाला नेत्रदान करुन समाजापुढे नेत्रदानाचा आदर्श ठेवला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, आपण कन्या रितीका हिच्या वाढदिवसाला अनमोल नेत्रदान केले आहे. नेत्रदानाचे महत्व लोकांना समजून देण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न राहिला आहे. प्रत्येकांने मरणोत्तर देहदान, नेत्रदान करायला हवे असल्याचे सांगून ते म्हणाले आपणाला नेत्रदान करण्याकामी बेळगांव केएलई डॉ. प्रभाकर कोरे हाॅस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरचे देहदानी डॉ. महांतेश बी. रामण्णावर यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. त्यांनीच आपणाला नेत्रदानासाठी पप्रा केले. आपण नेत्रदानाचे फाॅर्म भरुन ते बेळगांव केएलई रुग्णालयाचे कर्मचारी विजय पिरगानी, मयूर माळगी यांचेकडे सोपविले. आज आपणाला बेळगांव केएलई नेत्रपेढीकडून प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगितले.
सर्वत्र अभिनंदन
प्रभाकर पाटील यांनी कन्येच्या वाढदिवसाला नेत्रदान केलेबदल माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी, फ्रेडस फौंडेशनचे कुमार संसुध्दी, उमेश गोटूरे विजय पिरगानी, मयूर माळगी, लाडजी मुल्तानी, दयानंद आलुरी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.