संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याचा मीच मुख्यमंत्री होणार असे वारंवार सांगणारे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं आजमात्र मुख्यमंत्रीपद नकोरे बाबा असे सांगितले. हिरण्यकेशी कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना मंत्री उमेश कत्तीं यांची ट्यून बदललेली दिसली. यापूर्वी त्यांनी अनेकवेळा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. अखंड कर्नाटकचा ना सही शेवटी उत्तर कर्नाटकचा का होईना आपण मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. यावेळी मात्र त्यांनी माध्यम मित्रांच्या आपणाला झमेल्यात पडायचे नसल्याचे सांगत वन आहार व नागरी पुरवठा मंत्रीपदावर आपण समाधानी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटक विषयावर बोलण्याचे टाळले आहे. टीव्ही न्यूजवर आपण काॅंग्रेस पक्षात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ते धादांत खोटे आहे. आपण काॅंग्रेस पक्षात जाणार असल्याचे कोठेच म्हटलेले नाही. आपण भारतीय जनता पार्टीत आहोत. आणि भाजपातच राहणार आहे. भाजपा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे संचालक निखिल कत्ती, अप्पासाहेब शिरकोळी, प्रभुगौडा पाटील, सुरेंद्र दोडलिंगण्णावर, अशोक पट्टणशेट्टी, व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक संगम सहकारी साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta