संकेश्वर (प्रतिनिधी) : भजन, किर्तनातून मनाला मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही. बेल्लद बागेवाडी येथील जडीयसिध्देश्वर देवालयात चाललेल्या भजन कार्यक्रमात माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती सहभागी होऊन भजनात चांगलेच तल्लीन होऊन गेलेले दिसले. देवालयात कोणी मोठा आणि कोणी छोटा नसतो. तेथे सर्व भक्तगण समान असतात. माजी खासदार रमेश कत्ती हे देखील भजनी मंडळाचे टाळकरी बनलेले दिसले. भजनाच्या तालावर टाळ वाजविण्यात तल्लीन होऊन गेलेले दिसले. भजनात त्यांनी नवा हुरुप निर्माण करण्याचे कार्य केले. अलीकडे जो-तो मानसिक तणावाखाली जगताना दिसतो आहे. रमेश कत्ती हे तनावमुक्त होण्यासाठी कधी वयस्क लोकांच्या गप्पा-गोष्टीत तर कधी मुलांच्या विटी-दांडू, खेळात तर जादातर क्रिकेटच्या मैदानात स्वत:ला झोकून देतात. भजनातून त्यांनी आपली निःसीम भक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. रमेश कत्ती यांचा भजनाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत दिसतो आहे.
