हुक्केरी : एटीएम मशीनला अचानक लागलेल्या आगीत रोख रक्कम जळून खाक झाली. हुक्केरी शहरातील नवीन बस स्थानकानजीक असलेल्या कसाईखाना मार्गावर इंडिया एटीएममध्ये ही घटना घडली. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. मात्र अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळाची दाखल होईपर्यंत एटीएममधील सर्व रोख रक्कम जाळून खाक झाली होती.
शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण पोलिस तपासानंतरच नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.