Sunday , September 20 2026
Breaking News

विद्याभारती जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला- मुलींच्या हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला.
गुरुवारी या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष महादेव पुणेकर, संतमीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, क्रीडा शिक्षक प्रशांत वांडकर, मयुरी पिंगट या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पंच शिवकुमार सुतार यश पाटील चंद्रकांत तुर्केवाडी बसवंत पाटील उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेते संघ 17 व 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय विद्याभारती हँडबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *