संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर परिसरातील सर्वच श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. मठ गल्ली गजानन मंदिर सांस्कृतिक भवन येथे श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली. श्री गणेश जयंती निमित्त येथे पुरोहित नरेंद्र उपाध्ये यांनी पूजा अभिषेक करुन महाआरती सादर केली. त्यांनी सकल भक्तगणांना सुख शांती आरोग्य किर्ती यश लाभूदे अशी प्रार्थना केली. यावेळी भक्तगणांना तीर्थ प्रसाद वाटप करण्यात आले. येथील गणेश जयंती उत्सवात शाम पणशीकर, दिपक कुलकर्णी, बाळासाहेब तोरो, मुकुंद देशपांडे, सुहास जोशी, जीवन कुलकर्णी, परशराम कुरबेट, वीरभद्र हेद्दुरशेट्टी, अवधूत जोशी, महेश कुलकर्णी भक्तगण सहभागी झाले होते. भक्तगणांनी गणेश मंदिरात गणरायांचे दर्शन घेवून पुनित होण्याचे कार्य केले.
Check Also
संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी
Spread the love संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. …