संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरचा कराटेपटू कुमार वैभव राजू कुंभार आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. नुकतीच राजस्थान उदयपूर येथे चौथी आंतरराष्ट्रीय खुली कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. त्यात कु. वैभव कुंभार यांनी 10 ते 15 वयोगटात सहभागी होऊन सुवर्ण पदकाबरोबर रजत पदकही पटकाविले आहे. त्याला कोच गजेंद्रसिंग ठाकूर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. कु. वैभव यांनी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल संकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
कु. वैभव याचे येथील समस्त मराठा समाज अभिवृद्धी संघ आणि शंकरलिंग सौहार्द सहकारी संस्थेतर्फे सेक्रेटरी श्रीकांत गायकवाड, विनायक मळनाईक, संजय कागिलकर, संगीता भागवत, किरण सुतार, महांतेश मठपती यांनी सत्कार करुन अभिनंदन केले आहे.
