Tuesday , April 14 2026
Breaking News

सलामवाडी येथे श्री हालसिद्धेश्वर (हुग्गी) यात्रा भक्तिभावाने उत्साहात साजरी

Spread the love

 

दड्डी (वार्ताहर) : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हालसिद्धेश्वर (हुग्गी) यात्रेचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले आहे. शनिवार दि. 11 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली ही यात्रा रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी उत्साहात पार पडली.

यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता पाणी भरणे व मंडप उभारणी कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात झाली. रात्री 9 वाजता श्री भावेश्वरी देवी पालखीचे आगमन झाले. यावेळी भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक गाणी सादर करण्यात आली तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

रविवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पालखीचे श्री भावेश्वरी देवी मंदिराकडे आगमन झाले. त्यानंतर देवीचे विधिवत पूजन व भजन-कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले. यानंतर गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 1 वाजता भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सहा हजार भक्तांनी प्रसादचा व दर्शन चा लाभ घेतला.

या यात्रेसाठी ग्रामस्थ मंडळ, श्री हालसिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट व मुंबई मंडळ यांच्या वतीने नियोजनबद्ध तयारी करण्यात आली होती. यात्रेला परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भक्तीमय वातावरणात सहभाग नोंदवला. आयोजकांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वर जत्रेनिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा : निपाणीचा धीरज जाधव ठरला ‘शंकरलिंग श्री–2026’ विजेता

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील श्री शंकरलिंग देवस्थान जत्रेनिमित्त अचानक तरुण मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *