Monday , August 24 2026
Breaking News

आत्मविश्वासाने परीक्षा दिला तर यश नक्कीच मिळेल : सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे

Spread the love

 

बेळगाव : आजचे विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संस्कारक्षमही झाले पाहिजेत, कारण संस्कारक्षम विद्यार्थी हेच देशाचे भूषण आहेत. विद्यार्थ्यांनी होऊ घातलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला गेलात तर नक्कीच यश मिळेल, असे विचार लातूर येथील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे यांनी व्यक्त केले.
मनगुत्ती (ता.हुक्केरी) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंझारराव पाटील हे होते.
सुरवातीला शाळेचे मुख्याध्यापक डी. के. स्वामी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर क्रीडा शिक्षक एस. के. मेंडूले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर निवृत्त कॅप्टन मल्लिकार्जुन स्वामी यांच्याहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंझारराव पाटील यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विविध बौद्धिक व क्रीडा स्पर्धेत बक्षीसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सहाय्यक शिक्षिका गीता बेडका यांनी वार्षिक आवाहल सादर केला तर निवृत्त कॅप्टन मल्लिकार्जुन स्वामी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी भोसले यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. आर. ए. कामनगोळ यांचे विद्यार्थ्यांना निरोप देणारे भाषण झाले तर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंझारराव पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
याप्रसंगी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य मारुती कोतेकर, राजू पाटील, कोमल पाटील, आर. बी. शामणे, बाळू मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर के. एम. राऊत यांनी आभार मानले.
.

About Belgaum Varta

Check Also

शट्टीहळ्ळीत आषाढी एकादशीनिमित्त प्राथमिक मराठी शाळेत भक्तिमय पालखी सोहळा

Spread the love  विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांनी जिंकली मने शट्टीहळ्ळी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *