Monday , August 24 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील माचाळी येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; सुदैवाने प्राणहानी टळली

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील माचाळी येथे आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिक बाबल खंडेकर यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांना काही दुखापत झाली असली तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबल खंडेकर हे सकाळच्या वेळी जंगल परिसरात गेले असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हल्ल्यात जखमी झालेल्या बाबल खंडेकर यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून परिसरात अस्वलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, जंगल परिसरात वावरताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केसरेकर कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या; आमदार हलगेकरांची मुख्यमंत्री डी. के. शिवकुमारांकडे मागणी

Spread the love  खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *