Tuesday , August 18 2026
Breaking News

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी लक्ष घालण्याचे मनोज जरांगे यांचे आश्वासन

Spread the love

 

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण लक्ष घालू आणि या विषयाकडे गांभीर्याने पाहू, अशी ग्वाही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

सोमवारी कोल्हापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सीमाभागातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या जरांगे यांनी समितीच्या प्रतिनिधींशी संवाद साधत सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याचे समितीच्या नेत्यांनी सांगितले.

मनोज जरांगे हे खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये आले असताना ही भेट झाली. सीमाभागातील जनतेच्या भावना आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नांबाबत समितीच्या शिष्टमंडळाने त्यांना माहिती दिली.
यावेळी एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, सुहास हुद्दार, उमेश पाटील, श्रीकांत कदम, राजू पाटील, आशिष कोचेरी, संतोष कृष्णाचे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *