Monday , August 17 2026
Breaking News

श्री. वैजनाथ मंदिरासाठी मिथील जाधव यांच्याकडून तीन लाख रुपयांची चौकटची देणगी

Spread the love

 

 

बेळगाव : श्रीक्षेत्र वैजनाथ (ता. चंदगड) येथील मंदिराचे जिर्णोदराचे काम प्रगतीपथावर सुरू असून अंतिम टप्प्यात आलेले आहे. या मंदिरासाठी उचगाव (ता. बेळगाव) येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे उचगाव विभाग प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते मिथिल बाळू जाधव यांनी मंदिरासाठी सागवान लाकडाची तीन लाख रुपयेची चौकट देणगी दाखल दिली सदर चौकट दांडेली येथे आकर्षक नक्षीकाम मध्ये करण्यात येत असून त्या चौकटसाठी रक्कम काडाचे अध्यक्ष युवराज कदम आणि लँड ट्रिब्युनरचे सदस्य बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते एक लाख रुपये रक्कम देण्यात आली.

श्रावण महिन्यात चौकट आणणार
सदर चौकट श्रावण महिन्यात आणण्यात येणार असून मंदिरामध्ये बसविण्यात येणार आहे. यावेळी दांडेली येथील नजीर फर्निचर यांच्याकडे सदर चौकटीचे काम करण्यात काम करण्यासाठी देण्यात आलेले आहे. सदर चौकट आकर्षक पद्धतीची असून त्यावर उत्कृष्ट प्रकारचे नक्षीदार काम करण्यात आलेले आहे प्राचीन काळातील अनेक प्रकारची डिझाईन या चौकटीवर करण्यात आलेले असून श्रावण महिन्यामध्ये ही चौकट आणण्यात येणार आहे.
यावेळी अशोक चौगुले, प्रफुल्ल चौगुले, मिथील जाधव, मारुती खांडेकर, मुकुंद नवार, अमोल जाधव, संदीप पाटील, पारितोष हुकेरीकर, महेश आनंदाचे, साई पावशे, राहुल सुभेदार, दर्शन देसाई, अंकुश अष्टेकर, सौरभ जाधव, सुनील कोळी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

उचगाव येथील श्री रामलिंग मंदिरालाही चौकट देणगी

उचगाव येथील श्री. रामलिंग तलाव शेजारी असणाऱ्या श्री रामलिंग मंदिराचे जिर्णोदराचे कामेही प्रगतीपथावर सुरू असून या मंदिरासाठीही सौरभ दयानंद जाधव आणि मिथिल बाळू जाधव या दोघांनी मिळून सुमारे दोन लाख 21 हजार रुपयाची सागवानची नक्षीदार चौकट यावेळी त्याला करण्यासाठी देण्यात आली आहे. हे मंदिर सुद्धा या भागातील एक जागृत देवस्थान असून खूप पुरातन मंदिर आहे.

श्री क्षेत्र वैद्यनाथ हजारो भाविकांचे श्रद्धास्थान
यावेळी बोलताना काडाचे अध्यक्ष युवराज कदम म्हणाले की, वैजनाथ येथील श्री वैजनाथचे देवस्थान आणि उचगाव येथील रामलिंग देवस्थान ही शिव मंदिर असून दोन्ही मंदिरे असून पुरातन काळातील आणि खूप जागृत देवस्थान आहेत हजारो भाविक भक्त या ठिकाणी दररोज दर्शनासाठी येत असतात वैजनाथ येथे दररोज हजारो भाविक येत असतात आणि हे एक या भागातील जागृत देवस्थान आहे शासनामार्फत या मंदिराचे जिर्णोद्धार करण्यात येत असून या ठिकाणी एक आकर्षक मंदिर आणि पुरातन काळातील कला वैभव जपण्याचे काम या ठिकाणी करण्यात येत आहे या मंदिरासाठी आपल्या हातून मदत म्हणून मिथिल जाधव यांनी देणगी रूपाने ही चौकट दिल्यामुळे त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

श्री. रामलिंग मंदिर पुरातण काळातील जागरुत देवस्थान : बाळासाहेब देसाई
लॅन्ड टेब्युनरचे माजी सदस्य बाळासाहेब देसाई म्हणाले की, उचगाव येथील श्री. रामलिंग मंदिर हे या भागातील एक जागृत देवस्थान आहेत हजारो भाविक भक्त या ठिकाणी दररोज दर्शनासाठी येत असतात मंदीराचे जिर्णोदराचे काम या भागातील युवकांनी हाती घेतले असून तेही काम प्रगतीपथावर सुरू आहे यासाठी मिथिल जाधव आणि सौरभ जाधव यांनी दोन लाख 21 हजार रुपयाची चौकट या मंदिरासाठी ही दिलेली आहे. हे मंदिरही पुरातन काळाच्या अनेक कलाकृती जपण्यात येत असून तशाच पद्धतीची चौकट या ठिकाणी मंदिरासाठी करण्यात येत आहे. मंदिराचे काम आता प्रगतीपथावर असून काही दिवसात ही चौकट आणून त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले. यावेळी युवराज कदम यांच्या हस्ते त्यांना एक लाख रुपये देऊन कामाची पाहणी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

नागपंचमी दिवशीच विषारी सापाचा दंश; रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा मृत्यू

Spread the love  रायबाग : शेतात कचरा काढण्याचे काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *