Monday , August 17 2026
Breaking News

विद्यानगर अनगोळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Spread the love

 

अमित हलगेकर अध्यक्ष, श्याम गौंडाडकर उपाध्यक्ष; सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल

बेळगाव : विद्यानगर, अनगोळ येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची सन २०२६-२७ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाचे यंदाचे ४९ वे वर्ष असून आगामी काळात सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे मंडळाची वाटचाल सुरू आहे.

परंपरेला आधुनिकतेची आणि नव्या विचारांची जोड देत गणेशोत्सव अधिक व्यापक व समाजाभिमुख करण्याच्या उद्देशाने यंदा मंडळाने तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. तरुणांच्या निर्णयक्षमतेला संधी देत मंडळाचा कार्यभार नव्या नेतृत्वाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आदर्श निर्माण करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

यावेळी अध्यक्षपदी श्री. अमित आप्पाजी हलगेकर तर उपाध्यक्षपदी श्री. श्याम परशराम गौंडाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

– अध्यक्ष : श्री. अमित आप्पाजी हलगेकर
– उपाध्यक्ष : श्री. श्याम परशराम गौंडाडकर
– सरचिटणीस : श्री. राम कृष्णा पेडणेकर
– चिटणीस : श्री. राकेश लोहार, श्री. अमित पाटील
– खजिनदार : श्री. रवी हणमंत पेडणेकर
– उपखजिनदार : कु. नितेश रमेश मुरकुटे, श्री. प्रतिक चंद्रकांत पाटील

नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक उत्साहासोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांनी अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या मंडळाच्या आगामी वाटचालीकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

नागपंचमी दिवशीच विषारी सापाचा दंश; रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा मृत्यू

Spread the love  रायबाग : शेतात कचरा काढण्याचे काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *