Tuesday , August 18 2026
Breaking News

विद्यार्थ्यांच्या मोफत बससेवेसाठी अर्ज प्रक्रिया ठप्प; पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी सेवा सिंधु या शासकीय संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सध्या बस पाससाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित सेवा डिसेबल (बंद) असल्याची सूचना संकेतस्थळावर दिसून येत आहे.

यामुळे हजारो विद्यार्थी मोफत बससेवेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना दररोज प्रवासासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असून, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. मोफत बससेवेचा लाभ वेळेत मिळाला नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सेवा सिंधु पोर्टलवरील तांत्रिक अडचणी किंवा सेवा बंद ठेवण्यामागील कारणांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थी व पालकांनी राज्य सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून बस पास अर्ज सेवा पूर्ववत सुरू करावी, तसेच पात्र विद्यार्थ्यांना मोफत बससेवेचा लाभ त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *