Tuesday , March 18 2025
Breaking News

भाजपा युवामोर्चा एससी अध्यक्षपदी गंगाराम भूसगोळ

Spread the love

उपाध्यक्षपदी सचिन सपाटे यांची निवड

संकेश्वर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी चिकोडी जिल्हा हुक्केरी मंडल युवामोर्चा (एससी) घटक अध्यक्षपदी संकेश्वरचे नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांची तर (एसटी)घटक उपाध्यक्षपदी युवानेते सचिन सपाटे यांची निवड करण्यात आली आहे. हुक्केरी मंडल सामान्य युवामोर्चा प्रधानसचिव म्हणून युवानेते प्रदीप माणगांवी, सदस्यपदी संदिप दत्तू गोंधळी, संदिप दवडते, राजू बांबरे यांची निवड करण्यात आली आहे. वरील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विशेष अभिनंदन वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, माजी खासदार रमेश कत्ती, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरा शुगर अध्यक्षपदी बसवराज कल्लटी तर उपाध्यक्षपदी अशोक पट्टणशेट्टी यांची निवड

Spread the love  संकेश्वर : बहुचर्चित ठरलेल्या हिरा शुगरच्या नूतन अध्यक्षपदी बसवराज कल्लटी तर उपाध्यक्षपदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *