Saturday , July 27 2024
Breaking News

संकेश्वरात १२ मार्चला लोकअदालत : न्यायाधीश नागज्योती एम. एल.

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : तालुका कानून समिती संकेश्वरतर्फे येत्या १२ मार्च २०२२ रोजी संकेश्वर न्यायालय आवारात राष्ट्रीय लोकअदालचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सदुपयोग लोकांनी घेण्याचे आवाहन तालुका कानून सेवा समितीच्या सचिव, न्यायाधीश नागज्योती एम.एल. यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. न्यायाधीश पुढे म्हणाल्या, संकेश्वरात प्रथमच राष्ट्रीय लोक अदालत होत आहे. यामध्ये पक्षकारांनी समझोत्याने आप-आपले खटले मिटवू शकतात. कोर्टात गेल्या कांहीं दिवसांपासून चाललेले खटले देखील समंजसपणाने मिटविणेची संधी लोकअदालत मिळविता येते.
लोकअदालतमध्ये पक्षकारांना निःशुल्क प्रकरण दाखल करुन न्याय मिळविता येते. न्यायालयात एखादी केस दाखल असेल आणि तेथे पैसे भरलेले असतील तर पैसे वापस मिळवून सदर प्रकरण
लोकअदालतमधून सोडविता येते. क्रिमीनल प्रकरण, चेक बाॅंन्स प्रकरण, वैवाहिक संबंध, जीवनाश प्रकरणासाठी लोकअदालत उपयुक्त आहे. बॅंक आणि सहकारी पतसंस्थांनी आपले आर्थिक व्यवहार वसुली प्रकरण व्याज दर कमी करुन मिटवून घेण्याचे कार्य करावे.याकरिता बॅंक आणि सहकारी संस्थांनी पुढाकार घेण्याविषयी त्यांना कळविण्यात आले आहे. लोकांनी लोकअदालतचा सदुपयोग घेऊन आपले प्रकरणं समझोत्यांनी मिटवून घेण्याचे करावे. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत लोकअदालत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी न्यायाधीश भिमप्पा पोळ, संकेश्वर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए. एस.चौगला, उपाध्यक्ष ॲड. अनिल चौगुले, सेक्रेटरी ॲड. यु. एम पाटील, सरकारी वकील सतीश हिरेमठ, ॲड. विक्रम कर्निंग, ॲड. पी. वाय. गस्ती, संकेश्वर वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *