संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या आज्ञानुसार आणि शासनाच्या कोरोना नियमानुसार धार्मिक कार्यक्रमांनी आजपासून संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवयात्रा भक्तीमय वातावरणातय प्रारंभ झाली. हर-हर महादेवाच्या जयघोषणांत रथ श्री शंकरलिंग मठापासून श्री नारायण बनशंकरी मंदिराकडे दोरखडीने, लाकडी थरप लावून ओढत आणण्यात आला. उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रथोत्सव होत आहे
रथोत्सवात शंकरराव हेगडे, गजानन क्वळी, बाळू वैरागी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, नंदू मुडशी, संतोष कमनुरी, जयप्रकाश सावंत, दिपक भिसे, अविनाश नलवडे, पुष्पराज माने, राजू बांबरे भक्तगण सहभागी झाले होते. रथोत्सवाला दुपारी ३.३० वाजता सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजता रथ नारायण बनशंकरी मंदिराजवळ पोचला. संकेश्वरात प्रथमच रथ मठापासून नारायण मंदिराकडे केवळ दिड तासांत पोचला आहे.
महिलांचाही हर-हर महादेव-यंदा रथ ओढणेस मुली आणि महिलांनी हातभर लावलेला दिसला. महिला हर-हर महादेवाच्या जयघोषणा देत रथ ओढताना दिसल्या.
रथोत्सवाची अखंड परंपरा
गेल्या पाच शतकांपासून चालत आलेली संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाची परंपरा अखंडपणे चालत आलेली दिसताहे.
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजीं म्हणाले, संकेश्वर रथोत्सवाची परंपरा अखंडपणे चालू आहे. अनेक नैसर्गिक अपत्ती आल्यातरी रथोत्सवात कधीच बाधा आलेली नाही. यंदा कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत धार्मिक कार्यक्रमांनी रथोत्सव होत आहे. यावर्षी अष्टमी तिथीची वृध्दी असल्यामुळे रथाचा मुक्काम सलग तीन दिवस नारायण बनशंकरी मंदिराजवळ राहणार आहे. रथोत्सवाला ६ फेब्रुवारी २०२२ रोजी कोठी पूजनाने सुरुवात झाली आहे. ७-२-२०२२ रोजी रथपूजा करणं आली. आज रथ शंकरलिंग मंडळाकडून नारायण मंदिरकडे आणला गेला आहे.८, ९ आणि १० असे तीन दिवस रथाचा मुक्काम नारायण बनशंकरी मंदिराजवळ राहिल. शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी यात्रेचा मुख्य दिवस भरयात्रा (महायात्रा) होईल. त्यादिवशी रथ नारायण बनशंकरी मंदिराकडून श्री शंकरलिंग मठाकडे स्वस्थानी आणला जाईल. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी रथाचा कळस उतरवून यात्रोत्सवाची सांगता केली जाणार असल्याचे श्रींनी सांगितले.