खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भुरूणकी ग्राम पंचायतीच्या कामकाजाबद्दल युट्युब चॅनलच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन ग्राम पंचायतीची बदनामी करणारे जोतिबा भेंडीगिरी व परशराम कोलकार यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भुरूणकी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष मुबारक कित्तूर, उपाध्यक्षा विद्या महेश पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्यांनी मंगळवारी दि. ८ रोजी खानापूर येथील जिल्हा पंचायतीच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बोलताना अध्यक्ष मुबारक कित्तूर म्हणाले की, युट्युब चॅनलच्या माध्यमातून ग्राम पंचायतीच्या अध्यक्षाना एनआरजी कामाची माहिती द्यावी. अन्यथा युट्युब चॅनलच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी देत आहे. स्वतः रोजगार हमी योजनेत एक दोन दिवस काम करून आठवड्याचा पगार द्या. नाहीतर युट्युब चॅनलच्या माध्यमातून बदनामी करू, अशी धमकी देत आहे. पैशाची मागणी करत आहेत. तेव्हा अशा युट्युब चॅनलच्या माध्यमावर कारावाई करावी, अशी माहिती भुरूणकी ग्राम पंचायत अध्यक्ष मुबारक कित्तूर यांनी दिली.
यावेळी बोलताना उपाध्यक्षा सौ. विद्या पाटील म्हणाल्या की, ग्राम पंचायतीच्या कामात युट्युब चॅनलच्या माध्यमातून नाहक त्रास करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला ग्राम पंचायतीचे सदस्य मक्तुमहुसेन सावकार, विठ्ठल सागरेकर, मल्लापा यल्लापा तलवार, शोभा घोसवाले, बीबीजान पटेल, सदस्या गीता कोलकार, गीता शिंदोळकर, श्रीदेवी बडगेर, मजुळा दोडमनी आदी ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …