Sunday , July 26 2026
Breaking News

नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने जलवाहिनीची दुरुस्ती

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरातील महाद्वार रोड, संभाजी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गेल्या चार -पाच वर्षापासून गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मात्र नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

महाद्वार रोड संभाजी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गेल्या चार -पाच वर्षापासून गळती लागली होती. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेण्यात येत नव्हती. परिणामी या ठिकाणी दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता.

या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याची माहिती मिळताच या भागाच्या प्रभाग क्र. 10 च्या नूतन नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फक्त पाहणी करून न थांबता नगरसेविका भातकांडे यांनी यासंदर्भात सलग आठ-दहा दिवस महापालिकेमध्ये पाठपुरावा केला.

त्यांच्या या पाठपुराव्यामुळे काल सोमवारपासून महाद्वार रोड संभाजी गल्ली कॉर्नर येथील कूपनलिकेच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी यापद्धतीने जलवाहिनी गळतीची गांभीर्याने दखल घेऊन दुरुस्तीच्या कामास चालना दिल्यामुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *