बेळगाव : मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे आमदार अनिल बेनके म्हणाले.
बेळगावच्या जिल्हा स्टेडियमवर आज आयोजित स्वसंरक्षण कराटे कला प्रशिक्षण उपक्रमाचे उद्धघाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या सहसंचालक उमा साळीगौडर, गौरीशंकर कडेचूर, मागासवर्गीय कल्याण विभागाचे जिल्हा अधिकारी मेलनट्टी, युवक सेवा व क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. बालकृष्णन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही कठीण परिस्थितीत मुलींना स्वतःची काळजी घेता आली पाहिजे. स्वसंरक्षणासाठी मुलींना कराटे कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण पुढील काळात शाळांमध्ये दिले जाईल. याचा लाभ घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने स्वसंरक्षणाची कला शिकली पाहिजे, असेही अनिल बेनके म्हणाले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यावेळी बोलताना, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने भविष्याचे ध्येय निश्चित करावे आणि उन्नत ध्येय गाठावे, असे म्हटले.
यावेळी कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळा आणि मुरारजी देसाई निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कराटे कौशल्याचे प्रात्यक्षिक सादर केले.