संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गांधी चौक विठ्ठल मंदिर येथे रसिक मंडळ व संकेश्वरकरांच्या वतीने गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना अप्पा मोरे म्हणाले, लतादीदींनी 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. संकेश्वर करवीर पीठाधीश श्री कल्याणसेवक महास्वामी महाराजांनी लतादीदीना गानकोकिळा उपाधीने सन्मानीत केले होते. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी दीदींना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. दीदींची गाणी, त्यांचा सुमधुर आवाज रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.
यावेळी पुष्पराज माने, सुभाष कासारकर, उदय नाईक, मनोज देसाई, कृष्णा सुगंधी, शंकर सपाटे, रवी पाटील, संतोष पाटील, कुमार नेसरी, दीपक भिसे उपस्थित होते.
Check Also
वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Spread the love दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …