संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाच्या विकासात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे मोठे योगदान राहिल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले.
ते संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह श्रींचा आर्शीवाद घेऊन बोलत होते. मठातर्फे श्रींच्या हस्ते माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ए. बी. पाटील पुढे म्हणाले, मठात स्वामीजी आलेपासून अनेक सुधारणा झालेल्या पहावयास मिळत आहेत. श्रींनी मठाच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरा कायम करण्याचे कार्य केले आहे. श्रींच्यामुळे मठाला गतवैभव प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड जी. एस. इंडी, संचालक गंगाधर मुडशी, बसनगौडा पाटील, दयानंद केस्ती, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, मलगौंडा पाटील, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, प्रकाश ईटेकर, प्रशांत कोळी, कुमार कब्बूरी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत गिरीश कुलकर्णी यांनी केले. आभार सुहास कुलकर्णी यांनी मानले.