संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाला राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी धावती भेट देऊन देवदर्शनासह श्रींचा आर्शीवाद घेतला. मंत्रीमहोदयांनी रथोत्सव यात्रेत सहभागी होऊन मठाविषयीची माहिती जाणून घेतली. गिरीश कुलकर्णी यांनी मंत्रीमहोदयांना मठाविषयी माहिती देताना सांगितले श्री शंकराचार्य संस्थान मठात स्वामीजी ब्राह्मण समाजाचे असले तरी मठ सर्वांचा राहिला आहे. सर्व समाजाला समावून घेणारा मठ म्हणून श्री शंकराचार्य संस्थान मठाचा उल्लेख केला जातो. मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी हे सर्व समाजाच्या भक्तांचा आदारभाव ठेवणारे आहेत. मठात कसलाच भेदभाव, दुजाभाव केला जात नाही. बारा बलुतेदार आणि सर्व धर्मियांना मठात समान स्थान असल्याचे सांगितले.
यावेळी हिरण्यकेशी साखर कारखान्याचे संचालक शिवनायक नाईक, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, गजानन क्वळी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, गुरु कुलकर्णी, परगौडा पाटील, नंदू मुडशी, रमेश कुलकर्णी, सुहास कुलकर्णी उपस्थित होते. मंत्री उमेश कत्ती यांचा मठातर्फे श्रींच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.