संकेश्वर (प्रतिनिधी) : सापाला मारण्याचे पाप करु नका. सर्प हा शेतकऱ्यांचा पोशिंदा आहे. सर्प कोणालाही विनाकारण दंश करीत नसल्याचे संकेश्वर येथील सर्पमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, मोजकेच साप विषारी असून बिनविषारी सापांची संख्या अधिक आहे. आपण वयाच्या चौदाव्या वर्षापासून साप पकडणेची कला मोबाईल युट्युब वरून शिकूण घेतली. सर्प पकडणे ही एक कला आहे. ती आत्मधैर्याने शिकता येते. आतापर्यंत आपण जवळपास 5322 पेक्षा जादा साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे. आपण विषारी नाग, घोणस, कोब्रा नाग, मन्यार, फुरसे सर्पासह बिनविषारी कवड्या, धानम, वेरुळा, ककरी, तस्कर, मांढूस, काळ तोंड्या, अजगर, धामिण अशा सर्व प्रकारचे सर्प पकडून त्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून सर्पांना जीवदान देण्याचे कार्य केले आहे. सापाला मारणे पेक्षा त्याला वाचविणेत खरा आनंद आहे. सर्प दिसला की त्याला लाठ्या काठ्यांनी मारणे चे काम कोणी करु नका.साप आढळला की माझ्या मोबाईल क्रमांक 9986856457 वर संपर्क साधा. मी लागलीच येऊन सर्प पकडून नेण्याचे काम करीन. लोक सापाला घाबरतात आणि सर्प माणसाला घाबरतात. सर्पाला घाबरुन त्याला ठार मारणे हे पाप आहे. हे पाप कोणीही करु नका. सर्प पकडण्याची आपली कला आणखी वृध्दींगत व्हावी. यासाठी आपण सरकारी खात्यामध्ये सर्पमित्र म्हणून कार्य करण्यास इच्छुक आहे. लोकप्रतिनिधीनी आपल्या कार्याची दखल घेऊन आपणाला शासकीय सेवेत संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करायला हवे आहे.
