Saturday , July 27 2024
Breaking News

माणुसकीने जगायला शिका : विनोद कुलकर्णी

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : माणुसकीने जगायला शिका. तेंव्हाच जिवनात यशस्वी व्हाल, असे सेवानिवृत्त शिक्षक विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. ते संकेश्वर एस.डी. हायस्कूलमध्ये आयोजित सन १९८० (बॅचमेट) विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात बोलत होते. तब्बल ४२ वर्षानंतर वर्गमित्रांनी एकत्र येऊन उत्साही वातावरणात स्नेहमेळावा साजरा केला. प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी गुरुजन विनोद कुलकर्णी, श्रीमती एस.एम. मोमीन (मॅडम) यांचा गौरव करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. उपस्थितांचे स्वागत कॅप्टन महेश पाटील यांनी केले. विनोद कुलकर्णी सर पुढे म्हणाले आजकाल आपणा सर्वांना मानुष्कीचा विसर पडलेला दिसतो आहे. त्यामुळे अनेक वाईट गोष्टी घडताहेत. पैसे खूप आहेत पण मानसिक समाधान नाही. मग अशा पैशाचा काय उपयोग? पैशापेक्षा समाधान खूप महत्वाचे आहे.त्याकरिता आहे त्या परिस्थितीत आनंदाने जगायला शिकले पाहिजे. प्रत्येक चांगल्या कामात आनंद असतो‌‌. त्याकरिता एकमेकांना मदत करा.आनंदाने जगा असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना श्रीमती एस.एम. मोमीन मॅडम म्हणाल्या मोबाईलमुळे आजच्या पिढीचे जीवन धोक्यात आले आहे. शाळेत शिक्षकांकडून जे शिकविले जाते. ते विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहते. ऑनलाईन शिक्षणणामुळे मुलांत विसराळूपणा वाढला आहे. ऑनलाईन शिक्षण मुलांना घडविण्याचे नव्हेतर बिघडविण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे शक्यतो पालकांनी दररोज मुलांशी संवाद साधयला हवा. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना पालकांनी उत्तम संस्कार देऊन घडविण्याचे कार्य करायला हवे आहे. त्याकरिता पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा आहे. आपली भाषा लोप पावत चालली आहे. ती टिकविण्याचे कार्य सर्वांकडून होण्याची आवश्यकता आहे. ४२ वर्षांत आंमचे नातेवाईक आंम्हाला विसरले असतील तुम्ही मात्र आम्हाला विसरला नाही. यामुळे मनाला अत्यानंद झाल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी आभार प्रा. सदाशिव भेंडवाडे यांनी मानले. स्नेहमेळाव्याला महेश पाटील, मोहन ओतारी, शरद देशपांडे, सदा शिंदे, सुरेश देशपांडे, किरण कुलकर्णी, सुखदेव मोकाशी, प्रकाश जाधव, शमीम शेख, दशरथ माने, जोतिबा फडके, सुर्यकांत खाडे, चंद्रकांत किल्लेदार माजी विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षक-विद्यार्थी रिटायर्ड

एस.डी हायस्कूलमध्ये १९८० साली दहावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेहमेळावा पार पडला. तब्बल ४२ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमिंत्रात कोणी लष्करात सेवा बजावून तर कोणी सरकारी, तर कोणी खासगी कंपनीत सेवा बजावून सेवानिवृत्त झाला आहे. माजी विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक आणि विद्यार्थी दोघे रिटायर्ड असल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला दिसला.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *