Wednesday , November 29 2023
Breaking News

माघी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती येथे भाविकांची गर्दी

Spread the love

बेळगाव : श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा येथे बुधवारी होणाऱ्या माघी पौर्णिमेच्या निमित्ताने जत्रेचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने देशभरातील अनेक भक्त सौंदत्ती येथे दाखल होतात. य यात्रेसाठी मंगळवारपासूनच सौंदत्ती येथे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कोविड पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून पूर्ण क्षमतेने भाविकांना सौंदत्ती यल्लम्मा येथे येण्यास बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी माघी पौर्णिमेला मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र यंदा कोविड परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याने पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने मंदिर खुले केले असून बुधवारी होणाऱ्या माघी पौर्णिमेच्या निमित्ताने याठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
माघी पौर्णिमेला उत्तर कर्नाटकात भारत पौर्णिमा असेही म्हटले जाते. या पौर्णिमेच्या निमित्ताने यल्लम्मा डोंगरावर जत्रा भरविण्यात येते. या जत्रेच्या निमित्ताने डोंगर परिसर भाविकांनी फुलला असून ये परिसरातील दुकानेही सजली आहेत. कुंकू, भंडारा, कापूर, फळे, मिठाई यासह पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या देवस्थानामुळे येथील व्यावसायिक देखील अडचणीत आले होते. मात्र आता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले असून मोठी उलाढाल होण्याची आशा येथील व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
श्री रेणुका देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग ठरविण्यात आला असून उगरगोळ, जोगनभावी तसेच इतर भागात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. याठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून ५२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, वीज, निवारा, शौचालय या साऱ्या सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवस्थान प्रभारी कार्यकारी अधिकारी डॉ. ईश्वर उळागड्डी यांनी दिली आहे.माघी पौर्णिमेनिमित्त देशभरातील विविध भागातून भाविक सौंदत्ती येथे दाखल झाले असून यासाठी देवस्थान समिती, जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व सुविधा पुरविण्याची व्यवस्था केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

वैयक्तिक वादाला भाजपकडून राजकीय रंग : मंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love  बेळगाव : नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करून सोडल्याच्या नोंदी पोलिसांकडे आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *