संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर एस. डी. हायस्कूलमधील 1980 च्या वर्गमित्रांचा स्नेहमेळावा नुकताच गडहिंग्लज येथील हॉटेल ऐरावतमध्ये पार पडला. प्रारंभी दिवंगत शिक्षक घोरपडे सर, संसुध्दी सर, बी. के. पाटील सर, जागनुरे सर आणि दिवंगत वर्गमित्रांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. वर्गमित्रांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना कृषी अभियंता महेश पाटील म्हणाले, मोबाईल व्हॉट्सअप मेसजने आजचा स्नेहमेळावा होत आहे. वर्गातील आपल्या कॅप्टनने कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इस्त्रायल, हॉलंड येथील प्रशिक्षण घेतले. शेती व्यवसायात अनेक प्रयोग करून शेती व्यवसाय विकसित करण्याचे कार्य केल्याचे अभिमानाने सांगितले. यावेळी सदाशिव साळुंखे यांनी भूसेनेतील आपले अनुभव कथन केले. मोहन ओतारी, सुर्यकांत खाडे, शरद देशपांडे, सुरेश देशपांडे, सुखदेव मोकाशी, सुभाष गायकवाड, दत्ता कुलकर्णी, अरुण कापसे सदा शिंदे, किरण कुलकर्णी, दशरथ माने यांनी शाळेतील आणि आपल्या जीवनातील चांगले-वाईट अनुभव शेअर केले. शरद देशपांडे यांनी वर्गमित्रांसठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती.
Check Also
वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Spread the love दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …