संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक ६ मधील समस्या निवारण सभेत प्रभागातील नागरिकांनी अनेक समस्यांचे रडगाणे सादर केले. सभेत मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद, उपतहसीलदार आर. एस. बडचीकर, नगरसेवक सचिन भोपळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेत लोकांनी वेंकटेश नगर मधील रस्ता निर्माण कामांचा विषय उचलून तरला. दोन वर्षांपूर्वी वेंकटेश नगरमधील रस्ता कामांचा शुभारंभ करण्यात आला. रस्ता कागदोपत्री झाला आहे. प्रत्यक्षात मात्र रस्ता झालेले नसल्याचे नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पालिका शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था कधी करणार असा प्रश्न महादेव कुंभार यांनी उपस्थित केला. प्रभागात निटसे पथदिवे देखील नसल्याचे लोकांनी सांगितले.
चंदू माळी देवदास भोसले म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद यांनी नाममात्र समस्या जाणून घेण्याचे कार्य न करता समस्या सोडविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक सचिन भोपळे यांनी प्रभागातील समस्यांची अधिकारींना माहिती दिली. सभेला प्रितम निडसोसी, दत्ता थोरवत, बसवराज भरमण्णावर, नागरिक महिला उपस्थित होत्या.